उदय सामंत यांच्या गाडीवर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी हल्ला केला आणि आता ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. कदाचित हा सिलसिला सुरु राहणार आहे. पुढे कदाचित शिंदे गटाकडून ठाकरे गटावर हल्ला होऊ शकतो. आदित्य ठाकरे जिथे जात आहेत, तिथे उठाव केलेल्या आमदारांचा उल्लेख गद्दार असा करत आहेत.
( हेही वाचा : सलीमच्या बाजूला जावेद गेला, आता शोले कोण लिहिणार? )
नारायण राणे यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपल्याला मारायची सुपारी दिली होती असा गंभीर आरोप केला आहे. या आरोपावर ठाकरेंकडून आक्षेप घेण्यात आलेला नाही. यापूर्वीही भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. असे हल्ले केल्यानंतरही तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीच विशेष कारवाई केली नव्हती. तरी मीडियाने त्यांचा उल्लेख शांत, संयमी म्हणून केला होता हे आश्चर्यकारक आहे.
( हेही वाचा : पहिली एसटी कधी आणि कुठे धावली? आपल्या लालपरीचा रंजक इतिहास!)
शिवसैनिकांना वेळीच न आवरल्यामुळे आता हे दोन्ही गट समोरासमोर येण्याची दाट शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्याकडून लोकशाहीची भाषा केली जात नाही. उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना कधीही संविधानाचं महत्व पटवून दिलं नाही. किरीट सोमय्यांवर हल्ला केल्यानंतर एक मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंचं कर्तव्य होतं की या हल्ल्याचा कसून तपास करुन दोषींवर कठोर कारवाई व्हावी. पण ठाकरेंच्या मनात होतं तेच शिवसैनिकांनी केलं का? असा संशय घ्यायला जागा ठाकरेंनीच निर्माण केली आहे.
ठाकरेंना लोकशाही मार्गाने न्याय मिळणार नाही म्हणून त्यांनी संविधान नाकारुन थेट हल्ले करण्याचा निर्णय घेतलेला दिसत आहे. तसेही ठाकरेंनी संविधानाला फारसं महत्व कधीच दिलं नाही, लोकशाही फक्त निवडणूक लढण्या पुरती मर्यादित ठेवली. इतर वेळी त्यांनी संविधानाच्या विरोधात जाऊन कामे केली आहेत, असे आता वाटू लागले आहे. आता हाच आक्रस्ताळेपणा त्यांना नडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कारण ठाकरे गटाला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर मिळू शकतं. तसेच आता पोलिसी यंत्रणा देखील ठाकरेंच्या ताब्यात नाही. सरकार असताना पोलिसी यंत्रणेचा वापर करुन त्यांनी सामान्य नागरिकांना त्रास दिला होता. अर्णब गोस्वामी, सुनयना होळे, सुमित ठक्कर अशा नागरिकांना बळाचा वापर करुन त्रास दिला. पण आता ती यंत्रणा त्यांच्या विरोधात वापरली जाऊ शकते.
मला एका गोष्टीचं वाईट वाटतं की, ठाकरे कार्यकर्त्यांना लढवून स्वतः मातोश्रीमध्ये एसी ची छान हवा खात बसतील आणि बिचारे कार्यकर्ते मात्र जेलची हवा खातील. यात मराठी माणूस भरडला जात होता, आताही मराठी माणूस भरडला जाणार आहे. या मराठी माणसाला लवकरच सद्बुद्धी मिळो.
Join Our WhatsApp Community