महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी न्यायालयात सुरु असताना, ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केला आहे. हे सरकार पडणार म्हणून भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काॅंग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहेत, असा दावा खैरे यांनी केला आहे. खैरे यांच्या विधानामुळे आता राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले खैरे?
औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या बैठकीत बोलताना खैरे म्हणाले की, निवडणुकीत मुस्लिम समाजाची बोनस मते शिवसेनेला मिळतात. मुस्लिमांची 20 टक्के मते शिवसेनेला मिळणार असून, ते आपले बोनस मत आहे. तर लवकरच शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होतील आणि हे सरकार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे फडणवीस यांनी काॅंग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले असल्याचे विधान खैरे यांनी केले आहे.
( हेही वाचा: नवाब मलिकांना मोठा धक्का; ED जप्त करणार संपत्ती ? )
…त्यांनी इतरांच्या पक्षावर बोलू नये
शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरल्यास काॅंग्रेसचे 22 आमदार फडणवीस यांच्यासोबत जातील, असे विधान करणा-या खैरे यांच्यावर काॅंग्रेस नेते नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे. पटोले म्हणाले की, ज्यांना आपला स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही त्यांनी इतरांच्या पक्षावर बोलण्याचे कोणतेही कारण नाही, असा खोचक टोला पटोले यांनी खैरे यांना लगावला आहे.
Join Our WhatsApp Community