आदित्य ठाकरेंच्या वरळीत ठाकरे गटाला धक्का; युवासेनेचा पदाधिकारी शिंदे गटात सामील

133

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांचा पाठिंबा मिळवत राज्यात सत्तांतर घडवून आणले. तेव्हापासून ठाकरे गटातील अनेक नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक हे शिंदे गटात दाखल होत आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरेंचा मतदार संघ असलेल्या वरळीमध्येही ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. वरळीतील युवासेनेचा खंदा पदाधिकारी शिंदे गटात सामील झाला आहे.

राज्यातील विविध भागातून पदाधिकारी शिंदे गटात सामिल होत आहेत. वरळीतील युवासेना विभागीय चिटणीस साई किरण शिवपुरी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवपुरी हे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे खंदे समर्थक मानले जायचे.

( हेही वाचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला का गेला ? मुख्यमंत्र्यांनी सांगितले कारण, म्हणाले…. )

राज्यातील विविध भागातून शिंदे गटाला समर्थन 

जून महिन्यात शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी नाराज आमदारांना घेऊन उठाव केला. शिवसेनेच्या एकूण 55 आमदारांपैकी सुमारे 40 आमदार त्यांच्यासोबत गेले. तर 18 खासदारांपैकी 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. तसेच, अनेक महानगरपालिका, नगरपालिकांमधील नगरसेवक आणि अन्य पदाधिका-यांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.