अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ; आता निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन चौकशीचे आदेश

155

नवनिर्वाचीत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सिल्लोड प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी न्यायालयाने मंत्री अब्दुल सत्तार यांची या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. पोलिसांना सखोल चौकशी करुन 60 दिवसांत अहवाल द्यावा लागणार आहे.

( हेही वाचा: मराठा आरक्षण निवडसूचीतील १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार – मुख्यमंत्री )

सिल्लोडमधील महेश शंकरपेल्ली आणि पुण्यातील डाॅक्टर अभिषेक हरिदास यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि इतर लोकांविरोधात तक्रार दाखल केली होती.

अब्दुल सत्तारांवर काय आहेत आरोप

  • अब्दुल सत्तार यांनी सन 2014 आणि 2019 निवडणूक नामनिर्देशन शपथपत्रांमध्ये चुकीची माहिती दिली.
  • निवडणूक नामनिर्देशन शपथपत्रांमध्ये मौजे दहिगाव येथील शेत जमिनीचे मूल्य 2019 ला 2 लाख 76 हजार 250 व 2014 मध्ये 5 लाख 6 हजार दाखवली.
  • सिल्लोड सर्वे नंबर 90/2 वाणिज्य इमारतीची किंमत सन 2019 मध्ये 28 हजार 500 तर 2014 मध्ये 46 हजार रुपये नमूद केली.
  • प्रतिज्ञापत्रामध्ये सन 2019 मध्ये अब्दुल सत्तार हे BAFY 1984 ला यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड इथून तर 2014 चे प्रतिज्ञा पत्रानुसार, अब्दुल सत्तार हे HSC 1984 आणि BA अपियर्ड दाखवले आहेत.
  • त्यामुळे त्यांच्यावर सिल्लोड न्यायालयात सीआरपीसी 200 अंतर्गत आयपीसी 199,200, 420 व 34 तसेच लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 कलम 125 नुसार याचिका दाखल करण्यात आली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.