आदिपुरुष या चित्रपटावर आता भाजप नेते, आमदार राम कदम यांनी टीका केली आहे. हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, असे ट्वीट राम कदम यांनी केले आहे. त्यांच्या या ट्वीटने अनेकांचे लक्ष वेधले आहे. आदिपुरुष या चित्रपटाने देवीदेवतांचे विडंबन केले आहे, असा आरोप राम कदम यांनी केला आहे.
राम कदम यांनी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले आदिपुरुष हा चित्रपट निर्मात्यांनी आपल्या देवी देवतांचे विडंबन करुन कोट्यवधी हिंदू लोकांच्या भावाना दुखावल्या आहेत. आता वेळ आली आहे. त्यांनी माफीनामा द्यावा.
#आदिपुरुष फिल्म को महाराष्ट्र के भूमी प्रदर्शित नही होने देंगे#आदिपुरुष फिल्म मे पुनः एक बार फिल्म निर्माताओ ने ओछी पब्लिसिटी पाने के लिये हमारे #देवी #देवताओ विडंबन करके कराडो करोडो हिंदू लोगो की श्रद्धा और आस्था को आहत किया.
अब समय आ गया है .. केवल माफीनामा या विडंबन का
— Ram Kadam (@ramkadam) October 6, 2022
चित्रपटाची दृष्ये कट करुन काही होणार नाही. अशा घृणास्पद विचारसरणीला धडा शिकवण्यासाठी या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. तसेच, जे लोक यासाठी जबाबदार आहेत, त्यांना इंडस्ट्रीमध्ये काही वर्षांसाठी बॅन केले पाहिजे. जेणेकरुन भविष्यात असे करण्याचे धाडस कोणी करणार नाही, असेही राम कदम यांनी ट्वीटमध्ये लिहिले.
दृश्य काट छाट से काम नही चलेगा.
ऐसी घिनोनी सोच को सबक सिखाने के लिये
इस प्रकार के कोई भी फिल्म को आजीवन पुरी तरह से #बॅन तथा जिम्मेदार लोगोको भी
पुरी तरह से इस इंडस्ट्री मे काम करनेसे कुछ साल #बॅन कर दिया जाय..
ताकी भविष्य मे कोई भी ऐसी हिम्मत ना करे..
— Ram Kadam (@ramkadam) October 6, 2022
( हेही वाचा: “वेदांता प्रकल्पात टक्केवारी मागितली हे सिद्ध करुन दाखवा”; अजित पवारांचे शिंदेंना आव्हान )
नेटक-यांनी केले ट्रोल
आदिपुरुष या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलिज झाला होता. या चित्रपटात प्रभासन याने प्रभू रामांची भूमिका साकारली आहे. तर कृती सेनने ही सीता या भूमिकेतून आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे. या टीझरमधील VFX ला आणि सैफच्या लूकला काही नेटकरी सध्या ट्रोल करत आहेत.
Join Our WhatsApp Community