निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्याने ठाकरे गटाचे नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयाविरोधात पुण्यातील कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये चिन्ह गोठवलं पण रक्त पेटवलंय असा मजकूर छापण्यात आला आहे. सोबतच आमचे चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे , जय महाराष्ट्र असेदेखील लिहिण्यात आले आहे.
पुण्यात बॅनरबाजी
पुण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. चिन्ह गोठलंय पण रक्त पेटवलंय अशा आशयाचा मजकूर छापण्यात आला आहे. सोबतच आमचे चिन्ह बाळासाहबे ठाकरे, जय महाराष्ट्र अशा आशयाचे पोस्टरदेखील लावण्यात आले आहेत.
( हेही वाचा: भाजपाला फटका न बसता उद्धवसेनेला टक्कर देईल, अशा उमेदवाराचा शिंदे गटाकडून शोध )
ठाकरे गटाची उच्च न्यायालयात धाव
केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला. या निर्णया विरोधात ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community