ठाण्यात राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीचे आंदोलन

144

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जोरदार विरोध केला. गडकरी रंगायतन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासमोर ठाणे भाजपातर्फे करण्यात आलेल्या आंदोलनात राहुल गांधीच्या बॅनरला काळे फासून जोडे मारण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात तीव्र संताप पसरला आहे. त्याचे जोरदार पडसाद ठाण्यातही उमटले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासमोर भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या आंदोलनात महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे, माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर, सुनेश जोशी,मुकेश मोकाशी भाजपाचे शहर सरचिटणीस विलास साठे, कैलास म्हात्रे, मनोहर सुगदरे, उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनात राहुल गांधींच्या वक्तव्याचा धिक्कार करण्यात आला. तसेच त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

( हेही वाचा: राहुल गांधींविरोधात महाराष्ट्रात उद्रेक; ‘या’ ठिकाणी होत आहेत आंदोलने )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.