संसदेत महिला आरक्षणाच्या मतदानावेळी ठाकरे गटाचे खासदार (Maharashtra Politics) अनुपस्थित राहिल्याने शिंदे गटाच्या भावना गवळी यांनी त्यांना नोटीस बजावली आहे. भावना गवळी यांच्यासोबतच खासदार राहुल शेवाळे यांनी उबाठाच्या खासदारांना निलंबित करावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उबाठा आणि शिवसेना यांच्यात ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अधिक माहितीनुसार, शिवसेना पक्षाच्या (Maharashtra Politics) लोकसभेच्या प्रतोद भावना गवळी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी 14 सप्टेंबरला व्हिप काढला होता. महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने शिवसेना खासदारांनी मतदान करावं, असं भावना गवळी यांनी व्हिपद्वारे म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे चार खासदार हे अनुपस्थित राहिले होते. त्यानंतर आता त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : इर्शाळवाडीच्या चिमुकल्यांना मुख्यमंत्री निवासस्थानी मिळाला गणरायाच्या आरतीचा मान)
नारीशक्ती वंदन अधिनियम २०२३ संदर्भात लोकसभेत (Maharashtra Politics) झालेल्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून शिवसेनेचा व्हीप डावलणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला समर्थन करणाऱ्या विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव या चार खासदारांचे निलंबन करण्याबाबतही कायदेशीर सल्ला घेत असून याबाबत लोकसभा अध्यक्षांना देखील निवेदन देणार असल्याचे शेवाळे (Maharashtra Politics) यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community