Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ कट्टर समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश

389
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; 'या' कट्टर समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; 'या' कट्टर समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री शिंदे पुन्हा नव्या दमाने मैदानात उतरले असून त्यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. अशातच नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. ऐरोतील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

नवी मुंबईतील (Navi Mumbai) ऐरोलीतील माजी नगरसेवक मनोज हळदणकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे.

(हेही वाचा – Pune Crime: पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न!)

मनोज हळदणकर यांचे ऐरोलीत चांगले वर्चस्व आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती, मात्र अचानक हळदणकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगले काम करीत असून मी त्यांच्या कामापासून प्रेरीत झालो आहे. आगामी काळात ऐरोलीत चांगल्या विकासकामांची गरज आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, अशी प्रतिक्रिया ममोज हळदणकर यांनी दिली आहे.

भाजपाचे १६ नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार?
दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर येथील भाजपाचे तब्बल १६ नगरसेवक हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणुकीत आम्ही शिंदेंच्या शिवसेनेला मदत केली, मात्र त्यांनी आमचे साधे आभारही मानले नाही. उलट आम्हीच महायुतीत मोठा भाऊ असल्याचं सांगत शिंदे सेना आम्हाला हिणवत आहेत, असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.