मनसे-भाजपमध्ये खलबतं? शेलारांनी घेतली ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरेंची भेट

125

सध्या राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस यांचे सरकार सुरळीत सुरु झाले आहे. अशातच आगामी काळात कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात असताना मोठ-मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. दरम्यान, राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरू असताना भाजपचे नेते आणि मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलारांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या बाप्पांचे दर्शन घेतले. यासंदर्भातील माहिती शेलारांनी ट्विटवर फोटो शेअर करत दिली.

(हेही वाचा – नाशिककरांना दिलासा! प्रशासनाच्या आश्वासनानंतर Citylink बस चालकांचे आंदोलन मागे)

यापूर्वी गेल्या महिनाभरात भाजपच्या ३ ज्येष्ठ नेत्यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहेत. सर्वात आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यानंतर भाजपचे आणखी एक नेते विनोद तावडे यांनीही भेट घेतली, आता बुधवारी, ३१ ऑगस्ट रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दोन दिवसात राज ठाकरे यांना भेटणारे ते तिसरे भाजप नेते आहेत. राज ठाकरेंच्या भेटीला अनेक भाजप नेते गेले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात होणार चर्चा 

यंदाच्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणारे आहेत. त्याआधीच मनसेसोबत सलगी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे सूत्रांकडून समजते. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात मनसेसोबतच्या युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.