“शरद पवारांना फडणवीसांची भीती वाटत होती म्हणून…” बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

167

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत अनेक खुलासे केल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा यास दुजोरा दिला. पहाटेच्या शपथविधिमुळे राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, समजने वालो को इशारा काफी है असे पुण्यात शरद पवार म्हणाले. यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे.

( हेही वाचा : पंधरा मिनिटांमध्ये ‘बेस्ट’ बस! फेऱ्यांची संख्याही वाढली, प्रवाशांना दिलासा )

१५ वर्षे सत्ता आणता येणार नाही अशी भीती पवारांना होती – बावनकुळे 

यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांची भीती वाटत होती. “फडणवीसांनी २०१४-१९ या काळात जसे काम केले आहे अशा स्थितीत फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुढील १५ वर्षे सत्ता आणता येणार नाही अशी भीती शरद पवारांना होती” असे विधान बावनकुळे यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे.

पुढे ते म्हणाले, “शरद पवारांनी मान्य केले की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री न होऊ देण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र केले. माझे व्यक्तिगत मत आहे की, फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून पवारांनी या साऱ्या युक्त्या केल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात आपण आतापर्यंत जेवढी षडयंत्र पाहिली आहेत, जेवढे राजकीय पत्र तोडले गेले हे पक्ष कोणी तोडले? आम्ही बहुमताने निवडून आलो पण आमची युती तोडण्याचे काम शरद पवारांनी केले. त्यांच्या पक्षाला केव्हाच १०० च्या वर जागा जिंकता आल्या नाहीत. त्यांची पार्टी नेहमी ७५ च्या खाली राहिली. त्यामुळे सरकार बनवण्यासाठी त्यांनी नेहमी पक्षांची तोडफोड केली आणि शिवसेनेला उद्धवस्त केले आहे” अशी खोचक टीका बावनकुळे यांनी शरद पवारांवर केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.