Maharashtra Politics : भाजपा मुख्यमंत्री पदाबाबत धक्कातंत्र देण्याच्या तयारीत?

246
Maharashtra Politics : भाजपा मुख्यमंत्री पदाबाबत धक्कातंत्र देण्याच्या तयारीत?
  • खास प्रतिनिधी 

राज्यातील जनतेने महायुतीला अभूतपूर्व बहुमत दिल्यानंतरही राज्यात सत्ता स्थापन करण्यास विलंब का होत आहे, याबाबत उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या केंद्रातील चौकडीमुळे हा विलंब होत असून मुख्यमंत्री पदाबाबत भाजपा धक्कातंत्र देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Maharashtra Politics)

अंतिम निर्णय दिल्लीत

मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव अंतिम झाल्याची बातमी राज्यात वाऱ्यासारखी पसरली असून त्यांचेच नाव गृहीत धरण्यात येत आहे. मात्र, अंतिम निर्णय दिल्लीत होणार असून भाजपाचे राष्ट्रीय नेते अमित शाह, विनोद तावडे, भूपेंद्र यादव आणि जे. पी. नड्डा हे घेणार असल्याचे दिल्लीतील सूत्रांकडून समजते. (Maharashtra Politics)

(हेही वाचा – हिंदू देवतांबद्दल घृणास्पद विधान करणाऱ्या मौलाना रशिदीवर गुन्हा दाखल करा; Aniket Shastri Maharaj यांची राज्य सरकारकडे मागणी)

विधानसभेत तिसऱ्यांदा शंभरी पार

राज्यातील भाजपाचा चेहेरा देवेंद्र फडणवीस हे आहेत आणि यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढली गेली. भाजपाला कधी नव्हे इतके यश (१३२ जागा) मिळाले, यात फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे, हे मान्य करावेच लागेल. राज्यात सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला १०० पेक्षा अधिक जागा जिंकता आल्या. (Maharashtra Politics)

पवारांना शह देणारा नेता

फडणवीस यांची २०१४-२०१९ मुख्यमंत्री पदाची कारकीर्दही यशस्वी ठरली. २०१९ मध्येही फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी वेगळी खेळी केली आणि फडणवीस यांना विरोधी पक्षात बसावे लागले. त्यानंतरही त्यांनी खचून न जाता, ‘पुन्हा येण्याची’ तयारी सुरू केली आणि २०२२ मध्ये राज्यात पुन्हा युतीचे सरकार आले. यातही फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका होती. गेल्या शतकात शरद पवार यांना राज्यात शह देणारा कोणी नेता असेल तर ते फडणवीस, इथपर्यंत फडणवीस यांची ख्याती वाढली. (Maharashtra Politics)

(हेही वाचा – ICC Test Championship : दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या विजयामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं गणित पुन्हा बदललं, आफ्रिका दुसऱ्या स्थानावर)

मोदींच्या पावलावर

दिवसेंदिवस फडणवीस यांचा राजकीय ‘ग्राफ’ चढता राहिला आहे. इतक्या लहान (राजकीय) वयात जी राजकीय उंची फडणवीस यांनी गाठली, यामुळे त्यांनी स्वतः पक्षांतर्गत शत्रूही अंगावर घेतले. राज्यातील पक्षांतर्गत शत्रूंवर मात करण्यात ते बऱ्यापैकी यशस्वी ठरले पण दुसरीकडे राष्ट्रीय शत्रू निर्माण झाले. फडणवीस यांची वाटचाल आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर होत असल्याची चर्चा राष्ट्रीय राजकारणात होत आहे. फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री पद मिळाले तर त्यांच्या राजकीय प्रवासाला अधिक बळ मिळेल आणि मोदी यांच्यानंतर फडणवीस थेट पंतप्रधान पदाच्या शर्यतीत अग्रस्थानी असतील. (Maharashtra Politics)

एकच निरीक्षक दोन्ही वेळेस

फडणवीस काही राष्ट्रीय नेत्यांना ‘धोकादायक’ (political threat) ठरू शकतात आणि यावरून अंगुलीनिर्देश हा अमित शाह, भूपेंद्र यादव, जे. पी. नड्डा आणि विनोद तावडे यांच्याकडे केला जातो. विशेष म्हणजे २०१९ आणि २०२४ या दोन्ही विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून भूपेंद्र यादव यांचीच नेमणूक कशी झाली किंवा करण्यात आली, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. (Maharashtra Politics)

(हेही वाचा – Arjun Erigaisi : अर्जुन एरिगसीने कमावले २,८०० एलो रेटिंग गुण, आनंद नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू)

मराठाव्यतिरिक्त मुख्यमंत्री

राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस यांच्याऐवजी अन्य पण मराठाव्यतिरिक्त, कदाचित ओबीसी समाजातील नेत्यांचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा आहे. राजात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडण्याची शक्यता असून दोघेही मराठा समाजातील असल्याने मुख्यमंत्री पदासाठी मराठाव्यतिरिक्त उमेदवाराचा विचार केला जाऊ शकतो. (Maharashtra Politics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.