भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक ट्वीट करुन, मविआला इशारा दिला आहे. यात त्यांनी महाविकास आघाडीतील काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट या तिन्ही पक्षांतील नेत्यांची नावे जाहीर केली आहेत.
नव्या वर्षात घोटाळे बाहेर काढणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी जाहीर केले आहे. याबाबतचे ट्वीट करताना , त्यांनी 5 नेत्यांची नावे जाहीर केली आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे साई रिसाॅर्ट प्रकरण किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर आहेत. यासह राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काॅंग्रेसचे नेते अस्लम खान आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाचाही उल्लेख सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे.
New Year starting tomorrow
"19 bungalows of Thackeray Family
Anil Parab Sai Resort
Hasan Mushrif
Aslam Khan's 49 Studios
Kishori Pednekar SRA Flats
Mumbai Municipal Corporation "
GHOTALO ka Hisab Pura Karenge @BJP4India @mieknathshinde pic.twitter.com/KGI3B3Dqx6
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 31, 2022
( हेही वाचा: ठाण्यात भाजपा पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; भाजपचा शिंदे गटावर आरोप )
सोमय्यांच्या ट्वीटमध्ये काय
नव्या वर्षात ठाकरे कुटुंबाचे 19 बंगलो. अनिल परब यांचे साई रिराॅर्ट, अस्लम शेख यांचे 49 स्टुडीओ, किशोरी पेडणेकरांचे SRA मधील फ्लॅट्स, तसेच, मुंबई महानगरपालिकेतील घोटाळे, या गोष्टी नव्या वर्षामध्ये आपल्या निशाण्यावर असतील, असे किरीट सोमय्या यांनी ट्वीट करुन सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community