‘राज्यात हिंदुत्वाचं सरकार, तुम्हाला देवी सरस्वतीही वाचवू शकणार नाही’; राणेंचा भुजबळांना इशारा

97

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात चेंबुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललितकुमार टेकचंदानी यांनी भुजबळांवर धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात टेकचंदानी यांच्या तक्रारीनंतर छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत जोरदार हल्ला केला आहे. राज्यात हिंदुत्वाचे सरकार आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा नितेश राणे यांनी भुजबळांचे नाव न घेता दिला आहे. तसेच या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

काय म्हणाले नितेश राणे ?

नितेश राणे यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता ट्वीटरच्या माध्यमातून त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चेंबूर येथील व्यावसायिकाला देवी सरस्वतीचा द्वेष करणा-या राजकारण्याकडून धमकी, एफआयआर नोंदवला आहे. आता देवी सरस्वतीही वाचवू शकणार नाही, महाराष्ट्रात आता हिंदुत्वाचे सरकार आहे. ये याद रखना, असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.

( हेही वाचा: पाकिस्तान सरकारच्या ट्वीटर अकाऊंटवर भारतात बंदी; ‘हे’ आहे कारण )

गुन्हा दाखल झाल्याने भुजबळांच्या अडचणीत वाढ?

छगन भुजबळ यांच्याविरोधात धमकी दिल्याचा आरोप करत ललितकुमार टेकचंदानी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. टेकचंदानी यांच्या तक्रारीवरुन भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाची तातडीने चौकशी व्हावी, असी मागणी खासदार राहुल शेवाळे आणि आमदार अमित साटम यांनी केली आहे. त्यामुळे भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.