शिंदे गटाचे मंत्री आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना, आक्षेपार्ह शब्द वापरला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. या वादात आता उद्धव ठाकरे यांनी उडी घेतली आहे. ठाकरे म्हणाले की, या मंत्र्यांना हाकला, नाहीतर महानाट्याची चौथी घंटा वाजायला लागेल., असा इशारा त्यांनी सामना या मुखपत्रातून दिला आहे. त्यावर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत सडेतोड उत्तर दिले आहे.
भातखळकरांचे ट्वीट
भाजपचे आमदार भातखळकर यांनी ट्वीट केले आहे. भातखळकर म्हणाले की, देशद्रोही इब्राहिमशी आर्थिक व्यवहार करणा-या नवाब मलिकला अटक झाल्यानंतरही मंत्रीपदावरुन न हाकलणा-या लाचार माजी मुख्यमंत्र्यांच्या संतापाला विचरतो कोण, असा सवाल त्यांनी केला आहे.
देशद्रोही दाऊद इब्राहिमशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकला अटक झाल्यानंतरही मंत्रीपदावरून न हाकलणाऱ्या लाचार माजी मुख्यमंत्र्याच्या संतापाला विचारतो कोण? pic.twitter.com/BvPs9SJK1E
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 9, 2022
काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी शिर्डीतील पक्षांच्या मंथन शिबिरात बोलताना, सरकारमधील काही आमदारांनी खोके घेतल्याचे बोलले जात आहे. एकाही आमदाराने खोके घेतले नाहीत, असे समोर येऊन सांगितलेले नाही, असे म्हणत शिंदे गटाला लक्ष्य केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली आणि त्यांनी आक्षेपार्ह भाषेचा प्रयोग केला. त्यांच्या या विधानावरुन राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांनी शिंदे सरकारला लक्ष्य केले आहे.
Join Our WhatsApp Community