Maharashtra Politics : येत्या पंधरवड्यात राज्यात राजकीय भूकंप

केंद्रीय मंत्रिमंडळासह राज्यात होणार उलटफेर, मुख्यमंत्री दिल्लीतून तर उपमुख्यमंत्री बारामतीतून...

287
येत्या पंधरवड्यात राज्यात राजकीय भूकंप
येत्या पंधरवड्यात राज्यात राजकीय भूकंप
  • स्वप्नील सावरकर

कर्नाटकमधील निवडणूक आणि सर्वोच्च न्यायालयाचा १६ आमदारांबाबतचा निकाल या दोन्ही गोष्टींवर महाराष्ट्रातील सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रवादीतील सध्याचे अध्यक्षपदाचे कवित्व हे केवळ पवारांच्या पॉवरचे प्रदर्शन असून त्यामुळे पवारांची फक्त बार्गेनिंग पॉवर वाढेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. १० मे रोजी कर्नाटकमध्ये मतदान झाल्यावर लगेच निकालाचा अंदाज घेत आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात गेल्यास भाजपाचा BJP प्लान बी तयार झाला आहे. नुकत्याच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांच्या मुंबई दौऱ्यात ही योजना तयार झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह नवी रालोआ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीस सामोरी जाईल, अशी शक्यता आहे.

दादा डीसीएम तर सीएम…

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदेंच्या विरोधात गेला तर भाजपाने पुढचा मुख्यमंत्री दिल्लीतून पाठवण्याचे ठरवले असून राष्ट्रवादीचे दादा पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, असे राष्ट्रवादीच्या विश्वसनीय सूत्रांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari राज्यात मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळतील तर सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना Devendra Fadanvis दिल्लीत गडकरींच्या बदली बोलावून घेतले जाईल, असे कळत आहे.

(हेही वाचा NCP : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाविषयी विचारताच अजित पवार संतापून म्हणाले… )

केंद्रात राज्याचा दबदबा वाढणार

मोदींच्या मंत्रिमंडळातही यानिमित्ताने बदलाची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे-पवार, प्रफुल्ल पटेल, शिवसेनेतून (शिंदे) श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागेल आणि देवेंद्र फडणवीसांकडे गडकरींची खाती दिली गेल्यास केंद्रात मराठी टक्का वाढण्यास हातभार लागणार आहे.

मिशन ४८

२०२४ च्या लोकसभेत भाजपाने राज्यातील ४८ म्हणजे सर्व जागा जिंकण्याचा मनसुबा रचला आहे. अमित शहा यांनी ‘मिशन ४५’चे आता ‘मिशन ४८’ केल्याचे समजते. त्यात दक्षिण मुंबईतून मनसेच्या बाळा नांदगावकरांना, तर उत्तर मुंबईतून फडणवीसांना लढवण्याचे संकेत मिळत आहेत. एकूणच, राज्यातल्या ४८ जागा जिंकण्याचा महासंकल्प अमित शहा यांनी सोडल्याचे समजते.

(हेही वाचा  NCP : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाविषयी विचारताच अजित पवार संतापून म्हणाले… )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.