चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले, ‘माझ्यावरील शाईफेक हा भ्याडपणा, हिंमत असेल तर, समोरुन’..

158

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे पिंपरी चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्या चेह-यावर शाई फेकली. यानंतर पोलिसांनी शाई फेकणा-यांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मी कोणाला घाबरत नाही, हिंमत असेल तर समोरुन या, असे म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी सर्व कार्यक्रम करणार आहे. मी कोणाला घाबरत नाही. अशाप्रकारे पराचा कावळा करणे, दिलगिरी व्यक्त केली असतानाही असा भ्याडपणे हल्ला करणे चुकीचे आहे. हिंमत असेल तर समोरुन या. सगळे पोलीस डिपार्टमेंट बाजूला करतो, असे ते म्हणाले.

( हेही वाचा: चंद्रकांत पाटलांवर शाईफेक; दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात )

सर्व कार्यक्रमांना मी जाणार, बघू कोण काय करतं

पाटील म्हणाले की, हे चुकीचे पायंडे पडलेले आहेत. पोलिसांना दोष देण्याचे कारण नाही. पोलिसांनी कोणाकोणावर लक्ष द्यायचे. कार्यकर्ता कोण आणि बदमाश कोण हे कळणार कसे. देवेंद्रजींनाही मी सांगितले आहे की, कोणावरही कारवाई करु नका. मी सर्व कार्यक्रमाला जाणार आहे. बघू कोण काय करतेय, या समोर. पैठणमध्ये जे बोललो त्याचा विपर्यास केला आहे. मात्र पराचा कावळा केला गेला, लोकसहभागातून शाळा उभारल्या, असे म्हणण्याऐवजी मी ग्रामीण भाषेत बोललो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.