- प्रतिनिधी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह एकूण सहा विधान परिषद सदस्यांची आमदारकी रद्द करण्यात आली. संबंधित सहाही विधान परिषद सदस्य हे आता विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आल्याने महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Politics)
(हेही वाचा – Eknath Shinde यांना शपथ घेताना आठवले बाळासाहेब, दिघे आणि मोदी)
हे आहेत ते आमदार…
चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूरचे प्रवीण दटके, आमश्या पाडवी, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य होते. हे सर्व 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. ते आता विधानसभेत दाखल होणार आहेत. (Maharashtra Politics)
भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभेतून निवडणूक जिंकले. तर भाजपाचे गोपीचंद पडखळकरांनी जत विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली. भाजपाचे प्रवीण दटके यांनी नागपूर मध्य विधानसभेतून तर भाजपाचे रमेश कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. शिवसेनेचे आमश्या पाडवी अक्कलकुवा तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला आहे. (Maharashtra Politics)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community