महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जादू आता सोशल मीडियातही पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांचे दोन महिन्यांपूर्वी अवघे दोन लाख फाॅलोवर्स होते. आता हा आकडा दुपटीने वाढला आहे, तसेच या आकड्यात दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तर ‘शिंदेशाही’ आलीच आहे, पण आता सोशल मीडियातही शिंदेशाही पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियातून प्रचंड प्रतिसाद
23 मे 2022 एकनाथ शिंदे यांचे ट्वीटर फाॅलोवर्स 2लाख 12 हजार, 29 जून 2022 ट्वीटर फाॅलोवर्स 4लाख 30 हजार, 1 जुलै 2022 ट्वीटर फाॅलोवर्स 5लाख 33 हजार. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बंड केलेले नेते, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि गेल्या काही दिवसांत राज्यातल्या राजकारणात केंद्रस्थानी असलेलं नाव. याच एकनाथ शिंदेंना गेल्या काही दिवसांत सोशल मीडियातून प्रंचड प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे फाॅलोवर्स महिन्याभरात दुपटीने वाढले आहेत. शिवसेनेतून बंड केल्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी आपलं मत मांडलं ते ट्वीटरच्या माध्यमातून. बंडानंतरच्या 9 दिवसांत एकनाथ शिंदे यांनी तब्बल 74 ट्वीट केले.
( हेही वाचा: आता शिवसैनिकांकडून घेतले जातेय एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र )
सोशल मीडियाचा पुरेपुर वापर
सोशल मीडियाचा वापर करुन 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आलं आणि तेव्हा सोशल मीडियाची खरी ताकद समजली. तेव्हापासून प्रत्येक पक्ष लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून सोशल मीडियात त्यांची जोरदार चर्चा सुरु होती आणि त्यांचे फाॅलोवर्स दुपटीने वाढले. त्यामुळे एकनाथ शिंदेंची ‘शिंदेशाही’ आता सोशल मीडियातही पाहायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community