जनतेला जितेंद्र आव्हाडांची भीती वाटतेय!

109

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे एक सामान्य आमदार असले तरी त्यांची किर्ती दूरवर पसरली आहे. राज्यात अनेक लोक त्यांना चांगलंच ओळखतात. ते बर्‍याचदा शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घेतात पण या तिन्ही महापुरुषांना वर्ज्य असलेली कामे करतात. इशरत जहां या अतिरेकी महिलेची बाजू त्यांनी सुंदररित्या मांडली होती. आता केतळी चितळे या तरुण तडफदार व प्रामाणिक अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यात तिने आव्हाडांनी केलेल्या राड्यासाठी इतर कलमे देखील लावण्याची सूचना दिली आहे. तिचं म्हणणं असं आहे की याआधी आव्हाडांवर अनेक गुन्हे दाखल केले गेले आहेत.

( हेही वाचा : विदर्भातील ‘अंभोरा’ जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ होणार! २ हजार तरुणांना नोकरीची संधी)

मग अशा व्यक्तीला सहज जामीन कसा मिळतो हा केतकीचा आक्षेप आहे. केतकीचा आक्षेप अगदी खरा आहे. प्रश्न असा आहे की श्रीमंत लोकांना सहज कायद्यात तरदूत मिळते असा संशय सामान्य जनतेला येऊ लागला आहे. जितेंद्र आव्हाड यांची पार्श्वभूमी पाहता त्यांनी उघड उघड धमकी देखील दिलेली आहे. केतकी चितळेचं प्रकरण समोर आल्यावर त्यांनी दिलेली बाईक लोकशाहीला काळिमा फासणारी आहे. शरद परावांवर टीका केल्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि विशेषतः जितेंद्र आव्हाड आक्रमक होऊ शकतात, असा संकेत त्यांनी दिला आहे.

एरव्ही महात्मा गांधींच्या अहिंसेचा दाखला देणारे जितेंड आव्हाड अचानक अफजलखान सारखे वागू लागतात. अनंत करमुसेचं प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे त्याबद्दल फारसे बोलणे योग्य ठरणार नाही. परंतु एका सामान्य माणसाला बंगल्यावर बोलवून अमानुष मारहाण अफझलखानच करु शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालणारे लोक असं करु शकत नाहीत. कारण शिवाजी महाराज रयतेचं रक्षण करायचे. जितेंद्र आव्हाड रयतेला त्रास देतात. रयतेला त्रास देणारे देशद्रोही मुघल प्रभृती लोक आहेत.

मग जितेंद्र आव्हाड हिंदुस्थानचे दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवजी महाराज यांचं नाव का घेतात? असं कोणतं कारण आहे? कारण विवियाना मॉलमध्ये चित्रपट पाहायला आलेल्या सामान्य प्रेक्षकांवर ते दादागिरी करतात, सामान्य जनतेला त्यांचे लोक मारहाण करतात. बरं, हे त्यांचं पहिलं प्रकरण नसून त्यांचा इतिहास देखील स्वच्छ नाही. मग अशा लोकांपासून जनतेचं संरक्षण कोण करणार? जितेंद्र आव्हाड यांच्या सारख्या गुंड नि अफझलखान प्रवृत्तीच्या आणि दुर्दैवाने नेते असलेल्या लोकांमुळे जनतेमध्ये भितीचे वातावरण आहे.

उद्या आपलाही अनंत करमुसे होऊ शकतो अशी भिती सामान्य जनतेला वाटत आहे. अनंत करमुसे बचावले परंतु इतकी मारहाण झाल्यानंतर एखाद्या सामान्य व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. मग सामान्य माणसाने आपल्या कुटुंबासोबत चित्रपट देखील पाहायला जाऊ नये का? जर जितेंद्र आव्हाड किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गुंड तिथे आले आणि जनतेवर त्यांनी अत्याचार केला तर आम्ही दाद कोणाकडे मागावी?

सुप्रियातई सुळे यांच्यासारख्या मातृवात्सल्य असलेल्या महिला देखील जितेंद्र आव्हाडांची बाजू मांडतात. एक आई जनतेला वार्‍यावर कशी सोडू शकते असा प्रश्न मला सुप्रियाताईंकडे पाहून पडतो. त्यामुळे हे नेते आपले नाहीत असाच भाव मनात निर्माण होतो आणि आपण मुघलकाळात जगत आहोत अशी दुर्दैवी भावना निर्माण होते. जितेंद्र आव्हाड मुघलांचे एखादे सरदार वाटतात हा..हा.. म्हणता ज्याप्रकारे गावच्या गाव नष्ट व्हायची त्याचप्रकारे आव्हाड आणि त्यांचे गुंड सामान्य माणसाला मारहाण करताना दिसतात. त्यापेक्षा मोठे दुर्दैव म्हणजे स्वतःला जाणता राजा म्हणवून घेणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा हात अशा गुंड प्रवृत्तीच्या नेत्यावर आहे. मग शरद पवार यांनाच ही गुंडगिरी मंजूर आहे का? असा प्रश्नही मनाला सतावतो. थोडक्यात सर्वसामान्य जनतेमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विषयी भितीचं वातावरण आहे. पूर्वी मुघल यायचे आणि गावच्या गाव नेस्तनाबूत करुन जायचे. आता असे गुंड प्रवृत्तीचे नेते येतील अशी भिती जनतेला वाटू लागली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.