उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज, शुक्रवारी वाढदिवस असून त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. या सगळ्यांमध्ये मात्र देवेंद्र फडवणीसांची पत्नी अमृता फडणवीस यांनी दिलेल्या शुभेच्छांची चांगलीच चर्चा होताना दिसतेय. मिसेस फडणवीसांनी ट्विटद्वारे दिलेल्या शुभेच्छा सध्या चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी जिलेबीचे उदाहरण देत देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देत कौतुक केले आहे.
(हेही वाचा – गद्दार कोण? हे वरळी विधानसभेतील मतदारच सांगतील, राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल)
अमृता फडणवीसांनी जिलेबी भरवताना एक फोटो शेअर केला असून या फोटोसोबत हटके कॅप्शन देखील दिले आहे. या कॅप्शनमुळे अमृता फडणवीस यांचे ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होतेय.
काय म्हटले ट्विटमध्ये
जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! असे कॅप्शन देत अमृता फडणवीस यांनी दोघांचा जीलेबी भरवतानाचा फोटो ट्विट केला आहे.
जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते.
अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !#Devendra_Fadnavis pic.twitter.com/bHtz03Eo9Q— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) July 22, 2022
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सागर निवासस्थानी आमदार प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्यात. तर शिंदे गटातील आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी संजय राठोड, दादा भुसे, संदीपने भुमरे यांनीही भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे समजतेय.
दरम्यान, राज्यात सत्तांतर झाले. यानंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. विशेष म्हणजे या राजकीय प्रवासात फडणवीसांची पत्नी अमृता फडणवीस यांनी तितकीच मोलाची साथ दिली. नागपूरमधील डॉक्टर चारू आणि शरद रानडे यांची मुलगी अमृता फडणवीस. कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या अमृता यांचा मोलाचा वाटा देवेंद्र फडणीसांच्या राजकीय कारकीर्दीत असल्याचे सांगितले जात आहे.