आता सगळे सण जोरात करायचे, मुख्यमंत्री घरी बसणार नाहीत; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

122

भाजपा मुंबई कार्यकर्ता मेळावा आणि नवनियुक्त अध्यक्ष आशिष शेलार तसेच नूतन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. आपलं सरकार आल्यानंतर काय घडते, हे सर्वांनी पाहिले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत. असा टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

फडणवीस म्हणाले की, तुम्ही कालची मुंबई पाहिली का? तीच परंपरा, संस्कृती ही आपली परंपरा आहे. आपले सरकार आल्यावर काय घडते हे सर्वांनी पाहिले. आता सर्व जोरात करायचे आहे. गणेशोत्सव जोरात, नवरात्र जोरात, दिवाळी जोरात, आंबेडकर जयंती जोरात आणि शिवजयंतीही जोरात. आता सर्व जोरात करायचे आहे, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार या आपल्या दोन कार्यकर्त्यांचा आपण सत्कार केला. मंगल प्रभात लोढा यांनी तीन वर्ष समर्थपणे मुंबईच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. कोरोनाच्या काळातही चांगली अॅक्टिव्हिटी केली. एकही दिवस भाजप शांत बसलं नाही.

( हेही वाचा: Income Tax च्या नियमांत बदल, करदात्यांना मिळणार मोठा दिलासा )

प्रकल्पाच्या माध्यमातून मलई खाल्ली जातेय 

मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचा मोठा विळखा पडला आहे. किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली. आपल्या टीमनेही घोटाळे काढले. मुंबईत दरवर्षी पाणी तुंबलेले असते. मुंबईत तेच रस्ते आणि तेच खड्डे असतात. इतर शहरात सिमेंटच्या रस्त्यावर कधीच खड्डे पडत नाही. पण मुंबईत खड्डे पडत असतात.  प्रकल्प 15 वर्षांपासून सुरु आहे. हे प्रकल्प काही लोकांची दुभती गाय आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मलई खाण्याचे काम केले जात आहे, असे फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.