अविश्वास दाखवणा-यांचा आता न्यायालयावरील विश्वास वाढेल; भाजपचा उद्धव ठाकरे गटाला टोला

104

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला आहे. दसरा मेळाव्याचा निकाल उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने लागला. उच्च न्यायालयाने ठाकरे गटाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. यावरुन आता सुधीर मुनगंटीवर यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. काही नेत्यांकडून कायमच न्यायालयाच्या भूमिकेवर संशय घेतला जातो. मात्र यावेळी निकाल त्यांच्या बाजूने लागला आहे. अपेक्षा करुया की आता तरी या नेत्यांचा न्यायालयावरील विश्वास वाढेल, असे सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार शिंदे गट की ठाकरे गट यावरुन राज्याचे राजकारण तापले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचाच दसरा मेळावा होणार हे स्पष्ट झाले आहे.

( हेही वाचा: पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान PFI ने रचला होता हल्ला करण्याचा कट? ईडीचा दावा )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.