ईडीच्या कारवाईनंतर तब्बल 21 महिन्यानंतर कारागृहाबाहेर आलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अनिल देशमुख शनिवारी नागपुरात दाखल झाले. यावेळी पत्रकारांसोबत संवाद साधाताना अनिल देशमुख यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. 21 महिन्यांच्या कालावधीत मला व माझ्या कुटुंबियांना सातत्याने मानसिक त्रास दिला गेला. पण, मला न्याय दिल्याबद्दल मी न्यायदेवतेचे आभार मानतो, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच, मला कारागृहात दिलेला प्रस्ताव स्वीकारला असता तर महाविकास आघाडीचे सरकार आधीच पडले असते, असा मोठा खुलासा अनिल देशमुख यांनी केला आहे.
( हेही वाचा: काही लोक ‘दाऊद’सारखी; भगतसिंह कोश्यारी यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य )
Join Our WhatsApp Community