Maharashtra Politics : गेल्या १० वर्षांत ‘या’ नेत्यांनाही सोडावे लागले होते मंत्रिपद !

97
Maharashtra Politics : गेल्या १० वर्षांत 'या' नेत्यांनाही सोडावे लागले होते मंत्रिपद !
Maharashtra Politics : गेल्या १० वर्षांत 'या' नेत्यांनाही सोडावे लागले होते मंत्रिपद !

राष्ट्रवादीचे नेते धनजंय मुंडे (Dhanjay Munde) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा (Maharashtra Politics) दिला असून राज्यपालांनी देखील तो स्वीकारला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्यामुळे राजीनामा (resign) हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यापार्श्वभुमीवर गेल्या १० वर्षांत अनेक नेत्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. (Maharashtra Politics)

हेही वाचा-‘या’ औषधाच्या वापरला सरकारने परवानगी दिल्याने Haffkine ची कार्यक्षमता वाढणार

काही जणांना मंत्रिपदावरही पाणी सोडावे लागले होते. फडणवीस मुख्यमंत्री असताना तेव्हाचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राजीनामा द्यावा लागला. पुण्यातील एका भूखंड प्रकरणामुळे ते अडचणीत आले होते. उद्धव ठाकरे सरकारमधील वनमंत्री शिवसेनेचे संजय राठोड यांचा राजीनामाही तेव्हा चर्चेचा विषय ठरला होता. पूजा चव्हाण या युवतीच्या पुण्यातील मृत्यूप्रकरणी त्यांचे नाव वादात अडकले आणि त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. (Maharashtra Politics)

हेही वाचा-BMC : नालेसफाईत कंत्राटदारांचे कार्टेलिंग; संगनमताने महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला?

उद्धव ठाकरे सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप, अँटिलिया स्फोटके प्रकरणी देशमुख यांना एप्रिल २०२१ मधे राजीनामा द्यावा लागला होता. मुंबईवर झालेल्या २६ नोव्हेंबर २००८ च्या अतिरेकी हल्ल्यानंतर ताज हॉटेलची पाहणी करायला चित्रपट निर्माते राम गोपाल वर्माना घेऊन गेल्यानंतर विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. (Maharashtra Politics)

हेही वाचा-Champions Trophy : ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव करत भारतीय संघ दिमाखात अंतिम फेरीत

त्याचवेळी ‘बडे बडे शहरों में छोटे छोटे हादसे होते ही रहते है’ असे विधान केल्याने टीकेची झोड उठल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिला होता. ११ नोव्हेंबर २०१० रोजी आदर्श हाऊसिंग सोसायटी प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला होता. (Maharashtra Politics)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.