मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कामाख्या देवीचा नवस फेडला आणि म्हणाले…

162

महाराष्ट्रात शिवसेनेत यशस्वी बंड केल्यानंतर सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर व्हावा यासाठी मुखमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी आसाम येथील कामाख्या देवीला केला होता. सत्ता स्थापन होऊन ३ महिने उलटल्यावर शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आणि खासदार शुक्रवारी आसामला गेले. शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री शिंदे आणि शिंदे गटाच्या आमदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेत नवस फेडला आणि कामाख्या देवीच्या आशिर्वादाने आसाम आणि महाराष्ट्राचे वेगळे नात झाले. आसाममधील जनतेला आनंद, सुख, समुद्धी मिळाले. तसेच महाराष्ट्र ाच्या जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

असा झाला कर्यक्रम 

तीन महिन्यापूर्वी शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे आपल्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन आधी सुरतला आणि तिथून गुवाहाटी येथे मुक्कामी होते. गुवाहाटी येथे सर्वाधिक काळ त्यांचा मुक्काम होता. या काळात त्यांनी भारतातील एक प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन तिथे विशेष पूजा केली होती. आमचे प्रयत्न सफल होऊ देत असे साकडे देखील कामाख्या देवीला घालण्यात आले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री बनल्यानंतर आता पुन्हा एकनाथ शिंदे कामाख्य देवीच्या दर्शनाला आले आहेत. तिथे त्यांनी नवस फेडला. यावेळी त्यांच्यासोबत समर्थक आमदार आणि खासदारही उपस्थित होते. दर्शन झाल्यानंतर सर्वजण पुन्हा एकदा हॉटेल रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमध्ये पोहचले. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना राहण्यासाठी जवळपास संपूर्ण रेडिसन ब्ल्यू हॉटेलच बुक करण्यात आले आहे. याच हॉटेलमध्ये सत्तांतराच्या काळात देखील मुख्यमंत्री आणि आमदार वास्तव्यास होते.

(हेही वाचा विक्रम गोखलेंच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले – देवेंद्र फडणवीस)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.