दसरा अवघ्या दोन दिवसांवर आला असतानाच, ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते मिलींद नार्वेकर शिंदे गटात सामिल होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता मिलिंद नार्वेकर यांनी एक सूचक ट्वीट केले आहे. नार्वेकर यांनी शिवतीर्थावर दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी केली. त्यांनी हे फोटो ट्वीट करत माहिती दिली आहे. 5 ऑक्टोबर रोजी होणा-या शिवसेनेच्या पारंपारिक दरसा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरु असून रविवारी रात्री या कामाची पाहणी केली, असे नार्वेकर यांनी म्हटले आहे. एकीकडे मात्र नार्वेकर शिंद गटात जाणार असल्याची चर्चा असतानाच नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याची पाहणी केली.
५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू असून काल रात्री या कामाची पाहणी केली. तसेच येथे असलेल्या बंगाल क्लबच्या दुर्गोत्सवास भेट दिली व माँ दुर्गेचे दर्शन घेतले. pic.twitter.com/hzhh2YBMai
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) October 3, 2022
…म्हणून रंगल्या होत्या चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपतीनिमित्त मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेऊन आले होते. त्यानंतर नार्वेकरही शिंदे गटात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. अजूनही राजकीय वर्तुळामध्ये या चर्चांना उधाण आल्याचे चित्र दिसत आहे. असे असतानाच रविवारी म्हणजेच ज्या दिवसापासून शिवतीर्थावर ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचे काम सुरु झाले आहे त्या दिवसापासून नार्वेकर या कामावर लक्ष ठेवून आहेत. रात्री साडेदहा वाजता नार्वेकर स्वत: शिवतीर्थावर पोहोचले होते. तेथे जाऊन त्यांनी ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी केली.
Join Our WhatsApp Community