राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपच्या महिला पदाधिका-याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. मध्यरात्री आंदोलक पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून बसले होते. सकाळी आंदोलकांनी जाळपोळ केली. तसेच, मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेरील रस्ता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अडवून धरला आहे. आंदोलक वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न करत असून, याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.
( हेही वाचा: मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांचं ट्विट )