राष्ट्रवादीची मुलुखमैदानी तोफ शिंदेंच्या हाती; ‘बाळ्यामामा म्हात्रे’ शिंदे गटात दाखल

142
राष्ट्रवादीची ठाण्यातील मुलुखमैदानी तोफ, अशी ओळख असलेल्या बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाणे ग्रामीणमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद दुपटीने वाढली आहे.
राष्ट्रवादीचा ठाण्यातील प्रमुख चेहरा असलेल्या म्हात्रेंकडे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पद होते. शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी गेल्यावर्षी शिवसेना पक्ष सदस्यत्वासह ठाणे जिप सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही काळाने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र वर्षभरातच त्यांनी पक्ष बदलला आहे.

भिवंडीची जबाबदारी

बाळ्यामामा यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपला पाठिंबा युती सरकारला जाहीर केला होता. गुरुवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे पक्ष प्रवेशानंतर काही मिनिटांमध्येच सुरेश म्हात्रे यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.