मराठवाड्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी नवी दिल्लीत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे खोतकर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याच्या चर्चांना उधाण आले. पण आता मात्र या सर्व चर्चांना पुर्णविराम देत, अर्जुन खोतकर यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचे, स्पष्ट केले आहे. सोमवारी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर, अर्जुन खोतकर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले होते.
काय म्हणाले अर्जुन खोतकर
सोमवारी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटी घेतली. या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना, खोतकर म्हणाले की, मी माझ्या वैयक्तिक कामांसाठी दिल्लीला आलो होतो. या वेळेस योगायोगाने मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. मी शिंदे गटात सहभागी झालेलो नाही. त्यांच्याकडून कुठलाही दबाव नाही. मी शिवसेनेप्रमुखांचा सैनिक आहे, असे खोतकर यावेळी म्हणाले.
( हेही वाचा: खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा, पोलिसांचा बंदोबस्त तैनात )
Join Our WhatsApp Community