वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे नाराज झालेल्या संजय राऊतांनी आंबेडकरांना सबुरीचा सल्ला दिला, मात्र आंबेडकरांनी त्यांना सरळ धुडकावून लावत ‘कोण संजय राऊत, मी त्यांना ओळखत नाही’, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर गरबजले.
महाविकास आघाडीचा भाग होण्याची माझी इच्छा नाही, असे मी म्हणाणार नाही. पण आमची युती शिवसेनेशी आहे. जागा वाटपाबाबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. शिवसेना आणि वंचित एकत्र लढली आणि बाकी एकत्र नाही आले तरी आम्ही सरकार बनवू असे आंबेडकर म्हणाले.
(हेही वाचा स्वीडननंतर नेदरलँडमध्येही जाळले कुराण; मुस्लिम राष्ट्रांकडून नाराजी व्यक्त)
काय म्हणाले संजय राऊत?
शरद पवार हे भाजपचे आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी याआधी केला. त्यावर संजय राऊत यांनी ‘महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांविषयी अशी विधान करणे आम्हाला मान्य नाही, असे आरोप करणे गंभीर आहे. तसेच शरद पवार यांच्याशी बोलताना आंबेडकरांनी जपून बोलावे, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता.
Join Our WhatsApp Community