Maharashtra Politics : मुख्यमंत्री पदावरून फडणवीस आणि शिंदे समर्थक आमदारांमध्ये रंगलं वाकयुद्ध

106
Maharashtra Politics : मुख्यमंत्री पदावरून फडणवीस आणि शिंदे समर्थक आमदारांमध्ये रंगलं वाकयुद्ध

गेल्या वर्षभरापासून राज्यातील राजकारणात (Maharashtra Politics) बरीच उलथापालथ सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत हातमिळवणी केली त्यानंतर अजित पवार यांनी देखील ह्यांना साथ दिली. अशातच आता मुख्यमंत्री पदावरून फडणवीस, शिंदे आणि अजित पवार समर्थक यांच्यात सतत वादावादी सुरु असते. अशातच आता या वादामध्ये आमदार प्रसाद लाड आणि आमदार संजय शिरसाट यांनी देखील उडी घेतली आहे.

२०२४ नंतर एकनाथ शिंदे नाही तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री (Maharashtra Politics) होतील असा दावा आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे तर २०२४ मध्येही शिंदेच मुख्यमंत्री पदावर कायम राहतील असा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले प्रसाद लाड?

राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सरकार (Maharashtra Politics) स्थापन होईल आणि देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री होतील.निश्चितपणे यात काही शंका नाही, बाप्पाने हे निश्चितच केलं आहे, असा दावा भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. प्रसाद लाड पुढे म्हणाले की, २०२४ नाही, तर २०३४ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार या देशात राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

(हेही वाचा – Maratha Reservation : दडपण आणलं तरी माघार घेणार नाही – मनोज जरांगे पाटील)

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील – संजय शिरसाट

संजय शिरसाट म्हणाले की, राजकारणात (Maharashtra Politics) प्रत्येक पक्षाचा जो कार्यकर्ता असतो, त्याला निश्चितच असे वाटत असते की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. त्यामुळे प्रसाद लाड यांच्यासारखेच आमचेही म्हणणे आहे की, एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करत आहेत, पुढील वेळेला तेच मुख्यमंत्री राहावेत. प्रसाद लाड हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांनी त्यांच्या नेत्याचे नाव घेणे काही गैर नाही. आम्हालाही वाटते की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. अजित पवार यांच्या गटाला वाटते की, अजित पवार मुख्यमंत्री होतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.