सासू विरुद्ध सून; जळगाव दूधसंघाच्या निवडणुकीत रक्षा खडसेंचा मंदा खडसेंविरोधात प्रचार

76

जळगाव जिल्हा सहाकरी दूध उत्पादक संघ निवडणुकीत सर्वाधिक चुरशीची लढत म्हटली तर मुक्ताईनगर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार मंदाताई खडसे आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यात होत आहे. रक्षा खडसे या भाजपच्या खासदार असल्याने साहजिकच त्यांना आमदार मंगेश चव्हाण यांच्या बाजूने प्रचार करावा लागत आहे. याचाच अर्थ रक्षा खडसे यांनी सासू मंदाताई खडसे यांच्याविरोधात प्रचार मेळाव्यात सहभाग घेऊन मंदाताई खडसे यांच्याविरोधात असल्याने सासू आणि सुनेमधील ही लढत संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.

रक्षा खडसे यांची कोंडी

जळगाव दूध संघाच्या निवडणुकीमुळे भाजप खासदार रक्षा खडसे यांची कोंडी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण एकीकडे भाजप आणि शिंदे गटाचे नेते हे रक्षा खडसे यांच्या सासू मंदाताई खडसे यांच्याविरोधात बोलत आहेत. मुक्ताईनगर इथे प्रचार मेळाव्यात खडसे परिवाराच्या घराणेशाहीसह दूध संघातील अपहारप्रकरणी विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यामुळे रक्षा खडसेंना आपल्याच परिवाराच्या विरोधात टीका ऐकव्या लागत आहेत. खासदार रक्षा खडसे यांना आता आपल्या पक्षाशी आणि नेत्यांशी बांधिलकी दाखवत आपल्याच सासूच्याविरोधात प्रचारात उतरावे लागले आहे.

( हेही वाचा: बेळगाव दौरा अद्याप रद्द झालेला नाही; शंभूराज देसाईंचे स्पष्टीकरण )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.