कामाख्या देवीला केलेल्या प्रार्थनेमुळेच राज्यातील सरकार पडणार, ‘सामना’ तून सरकारवर टीकास्त्र

86

सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौ-यावर भाषण करण्यात आले आहे. सरकार पडणार असल्याचेही सामनात म्हणण्यात आले आहे. महाराष्ट्रातील जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत, आनंद, सुख-समृद्धी मिळावी असा नवस कामाख्या देवीच्या चरणी केल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात, पण महाराष्ट्रीवरील खरे संकट मुख्यमंत्री व त्यांचा गद्दार मिंधे गट हेच आहे. त्यामुळे देवी हे संकट लवकरात लवकर दूर करेल व महाराष्ट्रला सुखाचे, आनंदाचे, स्वाभिमानाचे दिवस आणेल याविषयी आमच्या मनात शंका नाही. देवी एकदम कडक आहे, याची प्रचिती येईलच, असे सामनात म्हणण्यात आले आहे.

….तर महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेस ते शोभणारे नाही

कामाख्या मंदिरास तंत्र- मांत्रिकाचे प्रमुख सिद्धपीठ मानले जाते. जगभरातले तांत्रिक एका विशिष्ट दिवशी येथे जमतात. त्यामुळे आई कामाख्यास तांत्रिक- मांत्रिकांची देवी म्हणून ओळखले जात असले तरी हा एक महान शक्ती साधनेचा गड आहे व लोक येथे एका श्रद्धेने येत असतात. अशी आख्यायिका आहे की, येथे बळी प्रथा आहे व लहान रेड्यांचा बळी दिला जातो. महाराष्ट्रात अनेक स्थानांवर कोंबडी, बक-याचा बळी दिला जातो आणि त्या अंधश्रद्धेस सगळ्यांनी विरोध केला आहे. पण शिवसेना फुटीनंतर महाराष्ट्रात सत्ता यावी म्हणून फुटीर गटाने असे बळी गुवाहाटीस जाऊन दिले हे खरे असेल तर महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेस ते शोभणारे नाही, असे सामनात म्हणण्यात आले आहे.

( हेही वाचा: परब यांचे निकटवर्तीय कदम यांना इडीने बजावले समन्स )

हा देवीचाच कोप 

आसामामध्ये  महाराष्ट्र भवन व महाराष्ट्रात आसाम भवन निर्माण करण्याबाबत ते बोलले. एकंदरीत पडद्यामाच्या हालचाली पाहता मुख्यमंत्री लवकरच माजी होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. कामाख्या देवीच्या नावाने भलते-सलते उद्योग करु नका. खोके सरकार व आता रेड्यांचे सरकार म्हणून आपण मशहूर झाला आहात हा देवीचाच कोप म्हणालया हवा, असे म्हणत सामनातून शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.