मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यापासून काँग्रेसपासूनही काही काळ लांब असणारे माजी खासदार संजय निरुपम यांची मागील काही दिवसांपासून जनतेमध्ये चर्चेत आहेत. ज्यांना काँग्रेस पक्षही विचारत नव्हता ते निरुपम आता शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर विरोधात आवाज उठवत मैदानात उतरताना दिसत आहे. निरुपम हे काँग्रेसचे नेते असताना किर्तीकर हे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाबाहेर पडून बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करत आक्रमक झाले. त्यामुळे निरुपम यांना उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेने डोळा मारलाय की या रिक्त जागेमुळे शिवसेनेला ते खुणावतात असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
( हेही वाचा : महापालिकेची प्रयोगशाळा होणार अद्ययावत : होणार १४ निकषांनुसार नमुन्यांची तपासणी)
मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरून संजय निरुपमांना पायउतार केल्यानंतर काही दिवस मिलिंद देवरा यांच्याकडे अध्यक्षपद सोपवल्यानंतर डिसेंबर २०२०पासून या अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जेव्हापासून काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावरून पाय उतार झाल्यापासून संजय निरुपम यांनी स्वत: पक्षापासून दूर राहण्याच्या निर्णय घेतला होता. मागील २०१९मधील विधानसभा निवडणुकीत निरुपम यांना पक्षाने विचारलेही नाही आणि निरुपम यांनीही पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभाग नोंदवला नाही. त्यामुळे मागील अडीच ते तीन वर्षांपासून पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे काहीसे लांब राहणारे निरुपम मागील काही दिवसांपासून खासदार गजानन किर्तीकर यांच्या विरोधात डरकाळी फोडत अचानक बाहेर पडल्याचे पहायला दिसून येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार फुटून त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष स्थापन राज्यात भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन केले. या बाळासाहेबांची शिवसेनेसोबत किर्तीकर हे जाणार हे जेव्हापासून सुरु झाले तेव्हापासून निरुपम यांच्या हालचाली वाढू लागल्या आहे. शिवसेना पक्ष फुटल्याने किर्तीकर यांनी पक्ष सोडल्याने यांचे दु:ख शिवसेनेऐवजी निरुपम यांनाच अधिक झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे किर्तीकर हे जणू काँगेसचे खासदार होते आणि त्यांनी पक्ष सोडल्याने निरुपम यांना दु:ख झाल्याने त्यांनी त्यांच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली असे वाटू लागले आहे. त्यामुळे किर्तीकर यांच्याविरोधात बोलण्यास शिवसेनेत कुणीही नसल्याने उध्दव ठाकरेंनी निरुपम यांना पुढे करून किर्तीकर यांच्याविरोधात बोलण्यास भाग पाडले असावे असे बोलले जात आहे.
सुत्रांच्या म्हणण्यानुसार, शिवसेना फुटल्याने उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा जुन्या शिवसैनिकांची गरज भासू लागली असून निरुपम हे पूर्वाश्रमीचे आणि आक्रमक नेतृत्व असलेले शिवसैनिक आहेत. त्यांच्या वक्तृत्व तसेच नेतृत्व करण्याचेही गुण असल्याने उध्दव ठाकरे हे निरुपम यांना पक्षात घेण्यास तयार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याला अडसर शिवसेना नेते संजय राऊत असल्याचेही बोलले जात आहे. निरुपम यांच्याकडे उत्तर भारतीय लोकांचे नेतृत्व सोपवले गेल्यास शिवसेनेला आगामी निवडणुकीत मोठा लाभ होऊ शकतो. त्यामुळे निरुपम यांना पक्षात घेण्यास राऊत यांची समजूत घालून पक्षात घेतले जावू शकते,असे काहींचे म्हणणे आहे. शिवसेनेतून फुटून निरुपम यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्यावेळी त्यांच्यासोबत गेलेले माजी नगरसेवक कमलेश राय यांच्यासोबत काही माजी नगरसेवक व कार्यकर्ते शिवसेनेत परतले आहेत. त्यामुळे निरुपम यांचा परतण्याचा मार्ग मोकळा असून खुद्द उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनाही निरुपम या अडचणीच्या वेळेत पक्षात असावेत असे वाटू लागले आहेत.
त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निरुपम यांना पुन्हा सक्रीय करून घेण्यासाठी शिवसेनेने आतापासून त्यांना मैदानात उतरवले असावेत. तसेच जर त्यांना विरोध झाल्यास आणि तिन्ही पक्षांची युती झाल्यास ही जागा काँग्रेसला सोडली जाईल आणि तिथून निरुपम यांना उमेदवारी दिली जावू शकते,असे बोलले जात आहे. निरुपम यांना पक्षात घेण्यासाठी आतापासून त्यांना किर्तीकर यांच्यावर सोडून एकप्रकारे भविष्यातील शिवसेना पक्षातील प्रवेशाचा मार्ग मोकळा करून घेण्याचा प्रयत्न निरुपम करत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे झोपी गेलेल्या निरुपमला शिवसेनेला जागे केले की शिवसेनेतील प्रवेशासाठी ते आता आपल्यातील जुना शिवसैनिक जागा करत आहे,असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
Join Our WhatsApp Community