मोठी बातमी! संजय राऊतांना शंभर दिवसांनी जामीन मंजूर

133

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. तब्बल शंभर दिवसानंतर त्यांची तुरुंगातून सूटका होणार आहे. 31 जुलैला संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली होती. दरम्यान, ईडीने उच्च न्यायालयात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.

( हेही वाचा:  लाचार माजी मुख्यमंत्र्यांच्या संतापाला विचारतो कोण? भाजपचा हल्लाबोल )

राऊतांवर कोणते आरोप 

ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 31 जुलैला ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांना सर्वात आधी ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. संजय राऊत यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रूपकडून 112 कोटी रुपये मिळाले होते. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. याच पैशातून अलिबाग येथे जमीन खरेदी करण्यात आली होती.

राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचे नाव सुरुवातीला समोर आले होते आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे फक्त नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊतच असल्याचा आरोप ईडीने केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.