तुम्ही मुके घेतले तुम्ही निस्तरा; आमच्या शिवसैनिकांना का अटक केलीत? राऊतांचा सवाल

120

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदरा प्रकाश सुर्वे यांच्या माॅर्फिंग व्हिडीओ प्रकरणारुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केला आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

तुम्ही मुका घ्या नाही तर मिठ्या मारा. आम्हाला का टार्गेट करत आहात? आमच्या कार्यकर्त्यांना का अटक केली जात आहे? तुम्ही मुके घेतले, तुम्हीच निस्तरा. त्याच्याशी आम्हाला घेणेदेणे नाही, असे सुनावतानाच सार्वजनिक ठिकाणी मुका घेणारे सुर्वे हे पहिले गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, सुर्वे यांच्या मुलानेच तो व्हि़डीओ लाईव्ह केला होता, त्याला अटक का केली नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

( हेही वाचा: प्रत्येक जिल्ह्यात ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे )

देशाचे सरन्यायाधीश, देशाचे घटनापीठ आम्हाला न्याय देईल

निवडणूक आयोगाने एक विचित्र निर्णय दिला आहे. त्यानंतर असे वाटले की या देशातील न्याय संपला. तरीही आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढाई आहोत. आम्हाला आशेचा किरण दिसत आहे. या देशाचा सरन्यायाधीश, देशाचे घटनापीठ आम्हाला न्याय देईल, असे राऊत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.