महाविकास आघाडीचे सरकार पायउतार होण्याच्या आदल्या दिवशी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करणाऱ्या आदित्य ठाकरे यांना शिंदे-फडणवीसांनी दणका दिला आहे. त्यांनी २८ जून २०२२ रोजी मंजूर केलेल्या ३८१ कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेला स्थगिती देण्यात आली आहे.
(हेही वाचा – … तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते; संजय राऊतांचा थेट इशारा)
२९ जून २०२२ रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. मात्र, त्याच्या एक दिवस आधी ३८१ कोटी रुपयांये खर्चाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेला मंजुरी देण्यात आली होती. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येताच घाईघाईने घेतलेल्या या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. परंतु, काही दिवसांनी ही स्थगिती उठवण्यात आली. असे असताना आता पुन्हा एकदा शासन निर्णय जारी करीत असून २ नोव्हेंबरच्या जीआरला स्थगिती देण्यात आली आहे.
आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट
प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत कॅरव्हॅन धोरण आणि साहसी पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न होता. आदित्य ठाकरेंचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात होता. सरकार पडण्याची कुणकुण लागताच त्यासाठी घाईघाईने ३८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे या निधी वितारणावर आक्षेप घेत शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
Join Our WhatsApp Community