शिंदे – फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

153

शिंदे- फडणवीस सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील बड्या अधिका-यांच्या बदल्या सरकारने केल्या आहेत. रात्री उशीरा हे बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. हे सर्व क्लास वन लेव्हलचे अधिकारी आहेत.

  • नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बदली करण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियु्क्ती झाली आहे. तर, अशोक शिनगारे यांची ठाणे जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.
  • अनुप कुमार यांची अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय येथे बदली झाली आहे. जयश्री भोज यांची महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय येथे बदली करण्यात आली आहे.
  • लीना बनसोड यांची अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास ठाणे या पदावर बदली झाली आहे. संजय खंदारे यांची प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय येथे बदली करण्यात आली आहे.

( हेही वाचा: ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान दिवाळीपर्यंत राबविणार – तानाजी सावंत )

  • निलेश गटने यांची मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे येथे बदली झाली आहे. तर डाॅक्टर प्रदिपकुमार व्यास यांची अप्पर मुख्य सचिव आदिवासी विकास विभाग मंत्रालय येथे बदली झाली आहे.
  • ए.आर.काळे यांची अन्न व औषध प्रशासन मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. तर, डाॅक्टर विपिन शर्मा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.