आदित्य ठाकरे हे केवळ 40 आमदारांना बदनाम करण्याचे काम करत आहेत. एककलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर शेंबडे मूलदेखील विश्वास ठेवणार नाही, अशी घणाघाती टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली. ते एका खासगी वाहिनीशी बोलत होते, तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
रामदास कदम म्हणाले की, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की, गजानन किर्तीकर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. मराठी तरुणांना नोकरी देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ते आले होते. तेव्हा आमच्यात चर्चा झाली. नुकताचे गोरेगाव येथे उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांचा मेळावा घेतला. तेव्हा किर्तीकर यांनी भाषण केले. त्या भाषणात किर्तीकर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली होती. भाजपसोबत गेले पाहिजे असे जाहीर भाषण त्यांनी केले होते. दसरा मेळाव्यात किर्तीकर यांनी मुलाखत दिली. तेव्हा तत्काळ भाजपसोबत गेले पाहिजे, असे विचारही त्यांनी मांडले होते, अशी माहिती रामदास कदम यांनी दिली.
( हेही वाचा: कॅनडात खलिस्तानी समर्थकांकडून भारतीयांना मारहाण, दिवाळीच्या कार्यक्रमात निंदनीय कृत्य )
आता या विषयावर मी बोलणार नाही
रामदास कदम म्हणाले, माझ्याकडे आले तेव्हादेखील त्यांनी खंत व्यक्त केली की, उद्धव साहेबांजवळ सुभाष देसाई, अनिल परब यांसारखे बडवे आहेत. त्यांनी उद्धवजींवरील नाराजी देखील माझ्याकडे स्पष्ट केली असल्याचे कदम यावेळी म्हणाले. गजानन किर्तीकर शिंदे गटात सामिल होतील का? यावर रामदास कदम म्हणाले की, आता या विषयावर मी बोलणार नाही.
Join Our WhatsApp Community