महाराष्ट्रासमोर ‘आदर्श’ घालून देणाऱ्या नेत्याच्या विधानांना महत्त्व देत नाही; शिंदे गटाचे प्रत्युत्तर

233
ज्या अशोक चव्हाणांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर ‘आदर्श’ घालून दिला, त्यांच्या विधानांना फारसे महत्त्व देण्याचे कारण नाही. ते काँग्रेसमध्ये नाराज असून, ‘इकडे-तिकडे’ जाणार शा बातम्या येत आहेत. जे स्वतः विधान परिषदेच्या निवडणुकीला गैरहजर राहिले, ते आता माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यावर स्वैर आरोप करत आहेत, अशी टीका शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली.
चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हस्के म्हणाले, निवडणूक हरल्यानंतर खैरे यांनी केलेली वक्तव्य ऐकली असता, ते पक्षासोबत किती एकनिष्ठ आहेत हे सर्वांनाच दिसून आले. आता ते मातोश्रीचे मन जिंकण्यासाठी वाट्टेल ते बरळत आहेत.
अंबादास दानवे हे यंदा पहिल्यांदा टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला आले. यापूर्वी कधीही ते ठाणे शहरात वा देवीच्या दर्शनाला आले नाहीत. यावेळी लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी पहिल्यांदाच त्यांनी या नवरात्रोत्सवाला हजेरी लावली. देवीच्या दर्शनासाठी आल्याने त्यांचा उचित मान ठेवण्यात आला, असेही म्हस्के म्हणाले.

( हेही वाचा: PFI नंतर आता SDPI वर देखील सरकार घालणार बंदी? )

देवी कोणाच्या पाठिशी हे स्पष्ट झाले…
दिघे साहेबांच्या पश्चात या देवीच्या नवरात्रोत्सवाचे आयोजन आणि त्यांनी सुरू केलेले उपक्रम एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना भान बाळगावे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्हबाबाबत निर्णय घ्यायचा अधिकार असल्याचे स्पष्ट केल्याने, या लढ्यात देवी कोणासोबत आहे ते स्पष्ट झाले आहे. कोणतेही विचार नसलेले लोक वाट्टेल ते बोलण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नसल्याचे म्हस्के यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.