Maharashtra Politics : राजकीय भूकंपाची शक्यता; शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये फूट ?

64
Maharashtra Politics : राजकीय भूकंपाची शक्यता; शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये फूट ?
  • प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसच्या नेत्यांबाबत मोठा दावा केला आहे. उदय सामंत सध्या दावोस दौऱ्यावर असून त्यांनी तिथूनच या राजकीय हालचालींबाबत माहिती दिली आहे. (Maharashtra Politics)

शिवसेना उबाठा आणि काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात ?

उदय सामंत यांच्या मते, शिवसेना उबाठाचे चार आमदार आणि तीन खासदारांनी मागील १५ दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिवाय काँग्रेसचे पाच आमदारही उपमुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात आहेत. येत्या तीन महिन्यांत उद्धव ठाकरे गटाचे दहा माजी आमदार, काही जिल्हाप्रमुख, आणि काँग्रेसचे माजी आमदार व खासदार शिवसेनेत सामील होतील, असा मोठा दावा सामंतांनी केला आहे. (Maharashtra Politics)

(हेही वाचा – Maha Kumbh 2025 मध्ये ५८० जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया, १,७०,७२७ ब्लड टेस्ट आणि हृदयविकाराचा झटका आलेल्या१०० हून अधिक भाविकांचे वाचवले प्राण)

शिवसेना उबाठात आणखी फूट ?

शिवसेना उबाठासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. आधीच एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना उबाठाला मोठा फटका बसला होता. आता आणखी आमदार, खासदार, आणि पदाधिकारी शिवसेनेत सामील झाले, तर उद्धव ठाकरे यांची राजकीय स्थिती कमकुवत होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)

काँग्रेसमधील नाराजीचा फायदा ? 

काँग्रेसमधील पाच आमदारही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या दाव्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजी आणि नाराजी उघड झाली आहे. काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया अपेक्षित आहे. (Maharashtra Politics)

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली आपला शेवटचा रणजी सामना कधी खेळला होता?)

दावोस दौऱ्यावरून मोठी घोषणा :

उदय सामंत यांनी सांगितले की, दावोस दौऱ्यावर महाराष्ट्राने पहिल्याच दिवशी ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक नोंदवली आहे. ही गुंतवणूक महाराष्ट्रासाठी मोठी आर्थिक संधी असल्याचे ते म्हणाले. मात्र त्यांच्या राजकीय वक्तव्याने या दौऱ्याच्या यशावरून लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)

राजकीय दूरगामी परिणाम :

उदय सामंत यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसने यावर कोणती भूमिका घेतली हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आगामी स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या हालचाली राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवू शकतात. (Maharashtra Politics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.