उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या मालकीवरुन सुरु असलेल्या वादाचा फैसला निवडणूक आयोग 8 ऑगस्टला करणार आहे. आता आयोगाने दिलेल्या या आदेशविरोधात न्यायालयाने स्थगिती देण्याची शिवसेनेने विनंती केली आहे. शिवसेनेने आयोगाच्या नोटीशीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेतील काही आमदारांनी आपली वेगळी भूमिका जाहीर केल्यापासून दोन्ही गटात शिवसेना आमची असल्याचा, दावा करण्यात येत आहे.
तर ठाकरेंचे भवितव्य अस्थिर
निवडणूक आयोगाने 8 ऑगस्टला दुपारी 1 वाजेपर्यंत आपले म्हणणे मांडण्याची मुदत दोन्ही गटांना दिली आहे. त्यानंतर निवडणूक आयोग या प्रकरणी सुनावणी करणार आहे. निवडणूक आयोगाचा कौल काय असणार, यावर उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यास उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह गमवावे लागू शकते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राकारणातील ठाकरेंचे भवितव्य अस्थिर होऊ शकते.
( हेही वाचा: प्रफुल्ल पटेलांवर ईडीची कारवाई, हे पवारांना किती ’पटेल’? )
आमचे संख्याबळ जास्त
एकनाश शिंदे गटाकडून सातत्याने शिवसेनेत उभी फूट पडल्याचा दावा केला जात आहे. आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, शाखाप्रमुख अशा प्रत्येक स्तरावर आमच्याकडे जास्त संख्याबळ असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community