…तर मग स्मारकासाठीचे 500 कोटी स्वत:च्या खिशातून खर्च करा; भातखळकरांनी उद्धव ठाकरेंना सुनावले

101

माझ्या वडिलांचे नाव वापरु नका म्हणता ना, मग महापौर बंगल्यात, उभारले जाणारे 500 कोटींचे स्मारक तुमच्या पैशाने उभारा, असे भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले. उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा माझ्या वडिलांचे नाव वापरु नका, असे शिंदे गटाला ठणकावून सांगितले. यावरुन अतुल भातखळकर यांनी हल्लाबोल केला आहे. ट्वीट करत त्यांनी उद्धव ठाकरेंचे “माझ्या वडिलांचे नाव वापरु नका” हे वाक्य घेत, पुढे म्हटले की मग महापौरांच्या बंगल्यात, उभारले जाणारे 500 कोटींचे बाळासाहेबांचे स्मारक स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करुन उभारा.

( हेही वाचा: फेरीवाला क्षेत्रात पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन करा, उर्वरितांचे सर्वेक्षण करा: भाजपची मागणी )

राऊतांना मुलाखत घ्यायची असेल तर…

सजंय राऊतांना मुलाखत घ्यायचीच आहे तर, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची घेतली पाहिजे. बंद खोलीत मुलाखत घेतात आणि काहीही बेछूट आरोप करतात. हे आरोप बिनबुडाचे आहेत. शिवसेनेने भाजपशी जो दडाफटका केला त्यातून सावरण्यासाठी अशाप्रकारे आरोप केले जात आहेत, असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.

 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.