महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर 22 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. आता ही सुनावणी 23 ऑगस्टला मंगळवारी होण्याची शक्यता आहे. न्यायालयातील त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर गेली आहे. महाराष्ट्रात नवनिर्वाचित शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले असले, तरी सत्तापेच मात्र कायम आहे. कारण महाराष्ट्र्रातील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या निवृत्तीची तारीख 26 ऑगस्ट आहे. त्यात सत्तासंघर्षावरील सुनावणी लांबत असल्याने खंडपीठ हेच राहणार का? याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तातडीच्या सुनावणीसाठी उद्धव ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाकडे पुन्हा मेन्शनिंग करावे लागेल पण ती विनंती मान्य होईल का? याचीही उत्सुकता लागली होती.
( हेही वाचा: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; करीरोड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड )
उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, तर शिंदे गटाकडून हरीश साळवे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. तसेच निवडणूक आयोगाकडून अरविंद दातार बाजू मांडत आहेत.
Join Our WhatsApp Community