राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. सुनावणी दरम्यान बुधवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी खडे बोल सुनावले आहेत. सरकार पडेल अशी कृती राज्यपालांनी टाळायला हवी होती, असे सरन्यायाधीशांनी सुनावले. महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या सुसंस्कृत राज्य आहे. पण अशा प्रकरणांमुळे राज्याला कलंक लागतो, असे सरन्यायाधीश म्हणाले.
महाधिवक्ते तुषार मेहता राज्यपालांच्या बाजूने युक्तिवाद करत आहेत. महाराष्ट्रात येऊन दाखवा, तुमचे फिरणे अशक्य करु अशा 47 आमदारांना धमक्या आल्या, असे ते न्यायालयात म्हणाले. यावर न्यायालयाने हे निरिक्षण नोंदवले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. आता निकालाच्या तारखेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिंदे गटाच्यावतीने मंगळवारी ज्येष्ठ वकील हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला. राज्यपालांच्यावतीने महाधिवक्ता तुषार मेहता यांचा युक्तीवाद सुरु आहे.
( हेही वाचा: 3 वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला? सरन्यायाधीशांचा सवाल )
विरोधी पक्षनेत्याचे राज्यपालांना पत्र ही नवी बाब नाही. महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या सुसंस्कृत राज्य आहे. अशा प्रकरणामुळे राज्याला कलंक लागला आहे. 4 आमदारांपैकी गटनेत्याचाच मुद्दा योग्य वाटतो. दरम्यान, त्याआधी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मोठी टिप्पणी केली होती. फूट पडल्यावर दरवेळी पक्ष सोडला जातोच असे नाही. 10 व्या सूचीनुसार विचार करता दोन गट आहेतच, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली होती. तसेच, 21 जूनलाच पक्षात दोन गट पडल्याचे म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community