सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सुरू आहे. सध्या राज्यपालांतर्फे महाधिवक्ता तुषार मेहता युक्तिवाद करत आहेत. यानंतर ठाकरे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करणार आहेत.
( हेही वाचा : सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुनावले खडे बोल; म्हणाले, यामुळे राज्याला कलंक लागतो )
तुषार मेहता यांचा युक्तिवाद
राज्यपालांना फक्त विधिमंडळ गटनेतेच माहिती असतात. त्यांचे राजकीय पक्षाशी देणं-घेणं नसतं. त्यामुळे राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी बोलावले आणि राजकीय पक्षाला किंवा पक्षाध्यक्षांना बोलावले नाही असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी केला आहे. राज्यपाल फक्त विधिमंडळ नेत्यांबाबतच बोलू शकतात पण, उद्धव ठाकरे तर विधिमंडळ पक्षाचे सदस्यही नाहीत असेही मेहता म्हणाले. दरम्यान राज्यपालांच्या वतीने तुषार मेहतांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आता कपिल सिब्बल यांनी रिजॉइंडर सादर करण्यास सुरूवात केली आहे.
विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यात फरत असतो. शिवसेना विधिमंडळ पक्षानेच एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळेच शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्यानंतर राज्यपालांनी प्रथम एकनाथ शिंदेंना बोलावले.
Join Our WhatsApp Community