ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले; याचिका तातडीने दाखल करुन घेण्यास नकार

194

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याने, ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत, तातडीने याचिका दाखल करण्याची विनंती केली. मात्र, तातडीने याचिका दाखल केली जाणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

का सुनावलं सर्वोच्च न्यायालयाने?

ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अर्ज मेन्शन न करताच सुनावणीची विनंती केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, मेन्शनिंग लिस्टमध्ये अर्ज दाखल करायला पाहिजे. लिस्टेड नसताना कोणतीही तारीख न्यायालय देऊ शकत नाही. आधी तुम्ही याचिका दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण करा आणि मग उद्या न्यायालयात या मग आपण पाहू, असे न्यायालयाने ठाकरे गटाला सांगितले आहे.

( हेही वाचा: ठाकरे गटाला आणखी एक धक्का; विधीमंडळातील शिवसेना कार्यालयात शिंदे गटाचा प्रवेश )

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.