शिंदे गटासह भाजपवर हल्लाबोल करत संजय राऊत मुंबईत परतले. नाशिककडे पाठ करुन मुंबईच्या दिशेने जात असताना, नाशिकची हद्दही सोडलेली नसताना ठाकरे गटाचे 11 माजी नगरसेवक, पदाधिका-यांनी आणि मनसेच्या एका शहर पदाधिका-याने मुंबईची वाट धरली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शुक्रवारी सकाळी 8 वाजता या सर्वांचा प्रवेश सोहळा वर्षा निवासस्थानी पार पडला.
यामध्ये ठाकरे गटातील मनपाचे विरोधी पक्षनेते, माजी स्थायी समिती सभापती, नगरसेवक यांच्यासह मनसेच्या शहर पदाधिका-यांचा समावेश आहे. ठाकरे गटाला हे खिंडार संजय राऊत माघारी फिरत असताना, पडल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. संजय राऊत यांनी पंधरा दिवसांच्या अंतरावर दोनदा नाशिक दौरा करुनही पदाधिकारी आणि नगरसेवकांना रोखण्यात यश आलेले नाही. राज्यात राजकीय गणित बदलल्यानंतर नाशिकमधून पहिल्यांदाच शिंदे गटात हा प्रवेश झाल्याने शिंदे गटाची ताकद वाढणार आहे.
यांनी केला शिंदे गटात प्रवेश
ठाकरे गटाचे मनपाचे विरोधी पक्षनेते अजय बोरसे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, सुवर्णा मटाले, माजी स्थायी समिती सभापती आर.डी. धोंगडे, नगरसेवक ज्योती खोले, सुदाम डेमसे, जयश्री खरजुल, प्रताप मेहरोलिया, चंद्रकांत खोडे, पूनम मोगरे, राजू लवटे आणि मनसेचे सचिन भोसले यांचा पक्षप्रवेश झाला आहे.
( हेही वाचा: सुषमा अंधारेंवर प्रत्येक जिल्ह्यात दाखल होणार गुन्हा )
मनधरणीचा प्रयत्न फसला
राज्यात राजकीय भूंकप झाल्यापासून नाशिकमधून पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाल्याने आगामी महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश ठाकरे गटाला मोठा धक्का देणारा आहे. संजय राऊत यांनी नाशिक दौ-यावर आल्यानंतर नाराज पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्या वन टू वन मुलाखती घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यश आले नाही.
Join Our WhatsApp Community