राजकारण म्हणजे मिमिक्री नाही. मिमिक्री पाहायची असेल तर आम्ही जाॅनी लिव्हरची पाहू. तिही ओरिजनल. आम्हाला मु्द्रा अभिनय, नाट्यअभिनय पाहायचा असेल तर आम्ही जाॅली लिव्हर, राजू श्रीवास्तवला पाहू. इतर अनेक आहेत. आम्ही खरी मिमिक्री पाहू असा टोला राऊतांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
( हेही वाचा: कामाख्या देवीला केलेल्या प्रार्थनेमुळेच राज्यातील सरकार पडणार, ‘सामना’ तून सरकारवर टीकास्त्र )
राऊत पुढे म्हणाले की, राजकारण म्हणजे मिमिक्री नाही. वेगवेगळ्या व्यक्तींचे आवाज काढणे, नक्कल करणे हे आता खूप झाले. आपण मॅच्युअर्ड झालेले आहात. संपूर्ण महाराष्ट्र पाहा, असे आवाहन करताना राऊत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करुन तुमचे राजकारण किती काळ चालणार असा प्रश्नही केला.
राऊतांचा राज ठाकरेंना सल्ला
संजय राऊत यांनी राज ठाकरे यांनी संघटनात्मक कामे करण्याचा सल्ला दिला. आमच्या पक्षावर संकटे आली असूनही आम्ही काम करत असून लढत आहोत. ज्यांनी आमच्यावर टीका केली, त्यांनी बुलढाण्याची सभा पाहायला हवी होती. बुलढाण्यातील प्रतिसाद पाहायला हवा होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला, सभेला मोठी गर्दी लोटली होती, असेही राऊत यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community